सांगली (Pclive7.com):- बेकायदा गर्भपाताच्या घटनेने सांगली पुन्हा एकदा हादरली. येथील चौगुले रुग्णालयामध्ये ७ बेकायदा गर्भपात झाल्याचे उघडकीस आले आहेत. पोलीस आणि वैद्यकीय विभागाने रुग्णालयावर धाड टाकून डॉ. रुपाली चौगुले यांना ताब्यात घेतले आहे.
कारवाई दरम्यान रुग्णालयातून गर्भपात करण्याची सामग्री, तसेच गर्भपात करण्याचे किट आणि काही संशयास्पद कागदपत्रेही जप्त केली आहेत. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येणार आहे, असे सुत्रांनी सांगितले.
यापूर्वीही सांगली येथील भारती रुग्णालयामध्ये असेच एक प्रकरण समोर आले होते. त्यावेळी त्या रुग्णालयात १९ भ्रूण आढळले होते. त्यानंतर पुन्हा अशा प्रकारची घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडालेली आहे.






















Join Our Whatsapp Group