पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात पिंपरी चिंचवड मधून नरेंद्र बनसोडे, मयूर जयस्वाल यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त शहरातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये प्रदेश युवक अध्यक्ष सत्यजीत तांबे यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी अमित जनक यांची निवड झाली. पिंपरी चिंचवडमधून मावळ लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस पदी निवडून आले आहेत. चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मयूर जयस्वाल यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी निवड झाली आहे.
तसेच चिंचवड विधानसभा युवक अध्यक्षपदी संदेश बोर्डे, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्षपदी हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा अध्यक्षपदी नासीर चौधरी यांची निवड झाली आहे. तर शहर सरचिटणीस म्हणून विरेंद्र गायकवाड, कुंदन कसबे, गौरव चौधरी, करण गिल, अनिकेत आरकडे, रोनक तावडे, डॉ स्नेहलता खोब्रागडे. चिंचवड विधानसभा युवक उपाध्यक्ष पदी सौरभ शिंदे, आदींची निवड झाली आहे. या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार साठे यांनी केला.






















Join Our Whatsapp Group