पिंपरी (Pclive7.com):- पर्यटनासाठी राजस्थानला गेलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील तरुणांच्या फॉर्च्यूनर कारला भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून शहरावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली–मुंबई महामार्गावर आज सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की फॉर्च्यूनर कारचा (MH14-MU-9331) चक्काचूर झाला आणि त्यामध्ये असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव, वाकड आणि महाळुंगे परिसरातील तरुणांचा एक ग्रुप २७ तारखेला पर राज्यात पर्यटनासाठी गेला होता. या ग्रुपकडे तीन आलिशान फॉर्च्यूनर कार होत्या. त्यापैकी एका कारला राजस्थानमध्ये हा अपघात झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. मृत तरुणांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून त्यांच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
(बातमी अपडेट होत आहे..)





















Join Our Whatsapp Group