पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विश्व श्रीराम सेनेच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. मंगळवारी (दि. २ ऑक्टोबर) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांनी भोसरी एम्आयडीसीचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भिमराव शिंगाडे यांना रुग्णवाहिकेची चावी दिली. तसेच प्रमोद गुप्ता, आक्रम शेख, सुभाष माजरे, दिलीप शिंगोटे, राहुल गुप्ता, रोहित प्रसाद, डॉ. जितेंद्रसिंग राठोड, डॉ. सौरभ चावरे, डॉ.ज्योती महाजिरे, धनजंय गुप्ता आदी उपस्थितीत होते.

पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांसाठी रक्त तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा १३५ गरजूंनी लाभ घेतला. तसेच विश्व श्रीराम सेनेच्यावतीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीसांना लालबाबू गुप्ता यांच्या हस्ते संगणक भेट देण्यात आला. स्वागत प्रमोद गुप्ता, आभार अक्रम शेख यानी मानले.






















Join Our Whatsapp Group