पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून नगरसेविका शितल नाना काटे, रोझलॅड रेसिडेन्सी सोसायटी व नाना काटे सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज रेडडॉट कॅम्पैन मोहीमचे आयोजन पिंपळे सौदागर येथील रोझलॅड रेसिडेन्सी सोसायटी येथे करण्यात आले होते. या मोहिमेवेळी रेडडॉट स्टिकरचे वाटप करण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथमच राबवलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे स्वागत रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकानी केले. त्याबद्दल त्यांनी नगरसेविका शितल नाना काटे, रोझलॅड रेसिडेन्सी सोसायटी व नाना काटे सोशल फाउंडेशन चे आभार मानले. नागरिकांना संबोधताना रेड डॉट कॅम्पैन हि संकल्पना रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातच न्हवे तर ती संपूर्ण चिंचवड मतदार संघामध्ये राबवली जावी असे आव्हान नगरसेविका शीतल काटे यांनी नागरिकांना केले.
यावेळी मुंबई आय आय टी च्या प्राध्यापिका रजजी अजवाणी यांनी नागरिकांना रेडडॉटचे फायदे सांगितले. जसे कि, मळलेल्या सॅनेटरी नॅपकिन आणि डायपर, स्वयंपाक घरातील कचऱ्यात मिसळण्यापासून प्रतिबंध करतील.तसेच वापरल्या जाणाऱ्या सॅनेटरी नॅपकिन, डायपर कचरा व्यवस्थापन स्वच्छता विषयक टाकाऊ पदार्थाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्याचे योग्य व्यवस्थापन व विघटन केल्यास त्यापासून कम्पोस्ट खत निर्मिती करता येईल.स्वच्छता विषयी काम करणा-या कामगारांना रेडडॉट कचरा वर्गीकरण करण्यास मदत होईल.यामुळे त्यांना होणाऱ्या आरोग्य समस्या टाळता येईल. रेडडॉट हा कचरा व स्वछेतेचा कचरा वेगळा करण्यास मदत होईल. आदी माहिती त्यांनी उपस्थित महिलांना, व नागरिकांना यावेळी दिली. या मोहिमेमध्ये रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील विविध सोसायटीचे चेअरमन, पदाधिकारी सभासद, व नागरिक मोठ्या संखेने उपस्तीथ होते.





















Join Our Whatsapp Group