पिंपरी (Pclive7.com):- मराठी नववर्षाच्या प्रारंभाचे प्रतीक असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने संत तुकाराम नगर येथील मैत्री चौकात मैत्री प्रतिष्ठाणच्या वतीने उत्साहात सार्वजनिक गुढी उभारण्यात आली. गुरूवारी (दि.१८) सकाळी प्रतिष्ठाणचे सर्व सदस्य पारंपारिक वेशभूषेत मैत्री चौकात एकत्र जमले. यानंतर वाजत-गाजत गुढीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. परिसरात ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपारिक उत्साहात ही मिरवणूक पार पडली.

या प्रसंगी माजी महापौर योगेश बहल, नगरसेवक राहुल भोसले, जितेंद्र ननावरे, नगरसेविका मनीषा लांडे, वर्षा जगताप, युवानेते विशाल मासुळकर यांच्यासह मैत्री प्रतिष्ठाणचे संस्थापक अनिल पवार, अध्यक्ष दयानंद केरकर, कार्याध्यक्ष सुहास साळुंके, उपाध्यक्ष मनीष कुलकर्णी, खजिनदार हनुमंत मुळीक, सचिव प्रितम विश्वले तसेच सुनिल बेळगांवकर, योगेश शाह, राहुल मोरे, हेमंत मोरे, मायला खत्री, बबनराव गाडवे, निखिल ढोले, राहुल नाईक, संदीप गायकवाड, हरप्रीत सिंग आदी उपस्थित होते.

मिरवणुकीनंतर मैत्री चौकात गुढीची विधिवत पूजा करून गुढी उभारण्यात आली. संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गरजू शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले तसेच उपस्थितांना साखरेच्या गाठी वाटण्यात आल्या. या कार्यक्रमास महिला, युवक, बालक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रतिष्ठाणतर्फे उपस्थित मान्यवरांचे सहर्ष स्वागत करण्यात आले. शेवटी सर्वांनी एकमेकांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





















Join Our Whatsapp Group