पिंपरी (Pclive7.com):- पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चौघांनी दरवाजाच्या फटीतून पेट्रोल टाकून घराला आग लावण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.२२) सायंकाळी निगडीतील ओटास्कीम येथे उघडकीस आला आहे.
या प्रकरणी एकनाथ बबन कुसाळकर (५०,रा.ओटास्कीम, निगडी ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, युवराज शेलार, राहुल शेलार, विभीषण शेलार, किरण शेलार ( सर्व रा.दत्तनगर, चिंचवड ) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुसाळकर आणि त्यांचा मुलगा रितेश घरात झोपले होते. दरम्यान, आरोपींनी दरवाजाच्या फटीतून पेट्रोल टाकून आग लावली. कुसाळकर यांना वेळीच जाग आल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने आग विझवली. घटनेची माहिती मिळताच खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पुढील तपास निगडी पोलिस करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group