पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने आज चिखली परिसरातील अनधिकृत फ्लेक्स आणि होर्डींगवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३७ बेकायदा फ्लेक्स आणि सुमारे १०० होर्डींग काढून टाकण्यात आले.

महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील जुना आरटीओ चौक, चेरी चौक, स्पाईनरोड भाजी मंडई परिसर वक्रतुंड हॉटेल, साने चौक भाजी मंडई, शिवम मार्केट, साने चौक, मथुरा स्विट होम, कस्तुरी मार्केट या ठिकाणी विनापरवाना फ्लेक्स मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज या फ्लेक्सवर कारवाई केली. या कारवाईत एकूण ३७ फ्लेक्स काढण्यात आले. तसेच परिसरातील विनापरवाना किआॅक्स, भिंतीवरील तसेच तार कंपाऊंड वर लावलेले १०० फलक काढण्यात आले. या कारवाईत जप्त केलेले साहित्य नेहरूनगर येथील आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करण्यात आले. या कारवाईत ‘अ’ व ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे कर्मचारी वर्ग हजर होते.
























Join Our Whatsapp Group