पिंपरी (Pclive7.com):- दळवीनगर, चिंचवड येथे लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी पहाटे घडली.
प्रदीप मोटे आणि शंकर क्षिरसागर अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे पावणे चार वाजताच्या सुमारास दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे आग लागल्याची वर्दी मिळाली त्यानुसार अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले.
घरातील एका सिलेंडरचा स्फोट झाला तर दोन सिलिंडरमधून गॅस गळती झाल्याने आग आणखीनच भडकली. अग्निशामक दलाने एक तासात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत दोघांचा होरपळून मृत्यू झाला होता. तसेच आसपासच्या पाच झोपड्यांनाही या आगीत जळून खाक झाल्या.