
रस्त्याच्या कामाचा दर्जा आणि गती वाढवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाची आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान कुणाल आयकॉन, शुभश्री, साई अवेन्यू अशा वेगवेगळ्या सोसायटीच्या गेट समोर पावसाळ्या दरम्यान पाणी साठते त्या ठिकाणी चेंबर बनवून त्याचे कनेक्शन स्ट्रॉम वॉटरला जोडण्याचे व त्या पाण्याचा सुरळीत रित्या निचरा करण्याचे सूचना दिल्या सुरू असलेल्या कामाचा दर्जा, गती आणि नियोजनाचा सखोल आढावा घेण्यात आला.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाचे डेप्युटी इंजिनिअर चंद्रकांत मोरे, विद्युत विभागाच्या डेप्युटी इंजिनिअर दिपाली रेडे, विद्युत विभागाचे सल्लागार, स्थापत्य विभागाचे ज्युनिअर इंजिनिअर विवेक गजपुरे, पाणीपुरवठा विभागाचे ज्युनिअर इंजिनिअर अंकुश सयाजीराव, तसेच इन्फ्राकिंग कन्सल्टन्सी इंजिनियर्स प्रा. लि. चे प्रकल्प सल्लागार आर. ई. राकेश पटेल आणि T@T इन्फ्रा लिमिटेडचे प्रोजेक्ट मॅनेजर युवराज आवारे आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी उच्च दर्जात व वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे अधोरेखित करत, कामाची गती वाढविण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच कामाच्या दरम्यान नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

या पाहणीदरम्यान स्थानिक सोसायट्यांचे चेअरमन, सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी मांडलेल्या सूचना व समस्या समजून घेत त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.
कुणाल आयकॉन रोडचे कॉंक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होणार असून, नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित रस्ता उपलब्ध होणार आहे. स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.





















Join Our Whatsapp Group