पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील वाहनचोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने धडक कारवाई करत एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून वाहनचोरी, घरफोडीच्या गुन्ह्यातील १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

परिमंडल ४ च्या पोलीस उप आयुक्त श्वेता खेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार वाहनचोरीच्या घटनांचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रकाश तेज विश्वकर्मा (वय २०) असे असून तो मोरेवस्ती, चिखली परिसरात राहणारा आहे. त्याच्याकडून विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या चार मोटारसायकली आणि एक दुचाकीचे स्पेअर पार्ट्स जप्त करण्यात आले आहेत.
जप्त वाहनांमध्ये समावेश :
MH 14 FW 4277 – यामाहा एफझेड
MH 14 JB 6379 – स्पेंडर
MH 14 BP 1650 – होंडा शाईन
MH 12 RD 3302 – होंडा शाईन

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने शहरातील विविध भागांतून वाहनचोरी केल्याची कबुली दिली आहे. या कारवाईमुळे वाहनचोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलिस उपायुक्त शेता खेड़कर यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल देवडे, सहायक पोलिस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस अंमलदार देवराम पारधी, विश्वास नाणेकर, किशोर सांगळे, युवराज बिराजदार, चेतन सावंत, राजेंद्र खेडकर, राजेश गिरी, महेश गायकवाड, राजकुमार हणमंते, प्रशांत कसबे, शिवाजी मरकड, आकाश घाडगे यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group