पिंपरी (Pclive7.com):- १५ हजार पणत्या प्रज्वलित करून तिमिराकडून तेजाकडे जाण्याचा दिव्य संदेश देत निगडी येथील भक्तीशक्ती समूहशिल्प उजळून टाकण्यात आले. दीपावली पाडवा सणानिमित्त निगडी येथील स्व.मधुकर पवळे प्रतिष्ठानच्या वतीने १५ हजार दिव्यांचा दीपोत्सव भक्तीशक्ती समूहशिल्प उद्यानात आयोजित करण्यात आला होता.
दीपोत्सवाद्वारे दीपावलीचा संदेश देत विद्युत रोषणाईसह, भव्य रांगोळी व फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी यावेळी करण्यात आली. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दीपोत्सवाला सुरुवात करण्यात आली. यानंतर नागरिकांनीही उत्साहाने दीपप्रज्वलीत करून दीपोत्सवाचा आनंद लुटला. यावेळी महापौर राहुल जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने, उद्योजक किरण चोपडा, चंद्रकांत पाटील, विपुल राठोड, किशोर गाथाडे, सचिन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
दीपोत्सवाचे संयोजन नगरसेविका सुमन पवळे,माजी नगरसेवक दत्तात्रय पवळे, संतोष कवडे, विजय गांगुर्डे, अभिजित भालसिंग, रोहित कडेकर, सतिश झेंडे, शिरीष राऊत, हरिष सटानकार, दीपक पवार, गणेश फुगे, प्रतीक कोलते, बाळा मोरे, अनिकेत चव्हाण, कुणाल गवारे, हेमंत सटानकर, यांनी केले. संदीप कवडे यांनी आभार मानले.





















Join Our Whatsapp Group