पिंपरी (Pclive7.com):- राजकारणात सक्रिय असलेल्या व्यक्तीचा वाढदिवस खरे तर शक्तीप्रदर्शनाचा एक उत्तम पर्याय झाला आहे..! पिंपरीमध्ये नुकताच अमित गोरखे यांचा वाढदिवस पार पडला. सहाजिकच त्यांनीही शक्ती प्रदर्शनाची संधी सोडली नाही…! त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला असेच चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे…!
अमित गोरखे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गिरीष बापट, शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, जेष्ठअभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यासह शहरातल्या अनेक स्थानिक सर्वपक्षिय नेत्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावल्याने अमित गोरखे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आपोआप वजन प्राप्त झाले…!
अर्थात या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमित गोरखे यांची स्तुप्त इच्छा जाहीर होण्यास मदत झाली… भाजप नेते गजानन बाबर यांनी अमित गोरखे पुढचे पिंपरीचे आमदार होतील असे जाहीर करून टाकले..! एवढ्यावरच हे सगळे थांबले नाही. भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनीही पिंपरी मतदारसंघ आरपीआय कडून सोडवण्यात यश मिळालेच तर बाबर सांगतील त्यांना तिकीट देऊ असे सांगत अप्रत्यक्ष अमित गोरखे यांना आमदारकीसाठी पाठबळ दिले आहे…! अमित गोरखे यांनाही पिंपरी विधानसभेचे तिकीट खुणावत आहचे..! आता शहरातल्या नेत्यांनी अमित गोरखे यांना वाढदिवसानिमित्त किमान त्यांची प्रबळ इच्छा दुसऱ्यांच्या तोंडून जाहीर झाल्याने वाढदिवसाचे शक्तिप्रदर्शन सफल झाले आहे… आता प्रश्न एकच आहे अमित गोरखे पिंपरीची बाजी मारणार का…?