
पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर प्रभागातील वेंटेज 21 या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत V21 युनाइटेड अँड पॉझिटिव्ह पॅनलने बहुमताने विजय मिळवला आहे. या निवडणुकीत सर्व उमेदवारांना रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विजयी उमेदवारांमध्ये राघवेंद्र रोडे यांची चेअरमनपदी, अमोल शिंदे यांची सेक्रेटरीपदी तर आनंद कान्हे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे. तसेच हनुमंत वाघेरे, अमोघ आंबेवाडीकर, ज्ञानेश आर्या, विश्वास इंगोले, शैलेश चासकर, अर्पित चिंतावार, सागर चौधरी, गौरी सकळकळे, दीपिका देशपांडे, आदर्श गवई, विवेक चौधरी आणि सोमनाथ रणमेळे हे सदस्य म्हणून निवडून आले आहेत.

वेंटेज 21 ही पिंपळे सौदागरमधील उंच आणि प्रमुख सोसायट्यांपैकी एक असून येथे सुमारे 254 रहिवासी वास्तव्याला आहेत. ही सोसायटी प्रगत (progressive) विचारांची असून पर्यावरण संवर्धन, पाणी व वीज बचत यावर विशेष भर दिला जातो. यामध्ये एसटीपी (STP) प्रकल्प आणि सौर ऊर्जा प्रणाली यांसारख्या उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. नवीन पदाधिकाऱ्यांकडून सोसायटीच्या विकासासाठी तसेच रहिवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये अधिक भर घालण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.























Join Our Whatsapp Group