पुणे (Pclive7.com):- मराठी साम्राज्याचा सुवर्णकाळ पाहिलेल्या शनिवारवाड्याचा २८७ वा वर्धापनदिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. पुण्यातील थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने वाड्याचा दिल्ली दरवाजा आज उघडण्यात आला.
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा…अशा ओळी कानावर पडताच मराठी माणसाला स्फुरण चढते…. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्रातून आणि प्रामुख्याने पुण्यातून तंजावरपासून पेशावरपर्यंत ‘अहद तंजावर तहद पेशावर’ ही घोषणा देण्यात आली होती. या घोषणेसह मराठी माणसाने स्वराज्याचा झेंडा अटकेपार नेला होता. दिल्लीच्या राजकारणावर सुमारे १०० वर्षे हुकुमतही ठेवली गेली. या घटनांचा साक्षीदार राहिलेल्या शनिवारवाड्याचा ‘दिल्ली दरवाजा’ वर्धापनदिनाच्या या कार्यक्रमानिमित्त उघडण्यात आला.
























Join Our Whatsapp Group