पुणे (Pclive7.com):- पुण्यातल्या येवलेवाडी भागात असलेल्या एका गोडाऊनला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना घडली. सुरुवातीला ट्रकने पेट घेतला आणि त्यानंतर गोडाऊनला आग लागली. या गोडाऊनमध्ये तेल आणि खाद्यपदार्थ ठेवण्यात आले आहेत. अद्याप ही आग नियंत्रणात आलेली नाही. ही आग नेमकी का लागली ते कारण समजू शकलेले नाही.
अग्निशमन दलाकडून ही आग नियंत्रणात आण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अग्निशमन दलाच्या आणखी चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.