पिंपरी (Pclive7.com):- चिंचवडमधील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी श्री स्वामी समर्थ मंदिरात खूप मोठ्या प्रमाणात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो. परंतु सध्या सर्वत्र कोरोनाचे भयंकर संकट आहे. यामुळे सरकारने घालून दिलेल्या नियमाचे पालन करून प्रतिष्ठानच्या मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये पाळणा व आरती करून श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी सर्व सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले. भाविकांना घरी बसल्या हा उत्सव बघता यावा यासाठी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन कीर्तन तसेच ऑनलाईन प्रवचनाचे आयोजन केले होते.
ऑनलाईन कीर्तन ह.भ.प श्री वासुदेव महाराज शिराढोणकर, तसेच ऑनलाईन प्रवचन ह.भ.प श्री दिपक महाराज शेळगावकर यांचे झाले. यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे हे उपस्थित होते. कोरोनाचे संकट लवकर आपल्या देशातून जावे अशी प्रार्थना श्रीकृष्ण चरणी करण्यात आली.
























Join Our Whatsapp Group