पिंपरी (Pclive7.com):- लायन्स क्लब पुणे सेलिब्रेशन च्या वतीने कोकणातील पूरग्रस्त बांधवांसाठी अति तातडीची मदत देण्यात आली. चिपळूण येथील मंजिरी व कोंदे ह्या गावी 200 कुटुंबासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यात किराणा साहित्याचे कीट तसेच अंथरुण- पांघरुन, साडी चोळी, शर्ट व सॅनिटरी नॅपकिन ह्या वस्तू प्रत्यक्ष त्याच्या घरी जाउन त्यांना एक हात मदतीचा देण्यात आला.
सेलिब्रेशन क्लबचे अध्यक्ष जितेंद्र ठोंबरे ह्यांनी मदतीसाठी केलेले आव्हान आणि त्याला मिळालेली भरपूर साथ ह्या जोरावर तीन दिवसात चार लाखांपर्यंत मदत गोळा झाली. ह्या उपक्रमासाठी प्रकल्प प्रमुख ला.धनंजय धुमाळ, ला.आप्पासाहेब सूर्यवंशी सेक्रेटरी ला.पद्मजा कदम, झोन चेअरपर्सन ला.भरत इंगवले ह्यांनी खूप मदत केली. त्याचप्रमाणे क्लब मधील सर्व लायन्सनी भरपूर मदत केली.
ही मदत पोहोचविण्यासाठी एमजेएफ ला. शशि कदम, ला.संदीप पाटील, ला.दत्तात्रेय सपकाळ, ला.प्रविण शिंदे, ला.अब्बासभाई चौधरी, ला.विशाल पाटे ह्यानी खूप परिश्रम घेतले.
ही मदत मिळाल्यामुळे कोकणवासीयांचे चेहर्यावर आनंद पाहावयास मिळाला. ह्या मदतीसाठी लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर व लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर अॅक्टिव्ह ह्याचे पण सहकार्य लाभले.

























Join Our Whatsapp Group