पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना उपशहरसंघटिका सौ.रूपालीताई परशुराम आल्हाट यांच्या दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंदजी सावंत, शिवसेना नेते पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिनजी अहिर, शिवसेना उपनेते रविंन्द्रजी मिर्लेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुलभा उबाळे, कामगार नेते इरफान सय्यद, शिवसेना भोसरी विधानसभाप्रमुख धनंजय आल्हाट, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेशजी मुटके यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी अरविंद सावंत मार्गदर्शन करताना म्हणाले, “सौ.रूपाली आल्हाट यांच्या कार्याबद्दल सचिन अहिर व रविंद्र मिर्लेकर यांनी माहिती दिली आहे. गेली १० वर्षे रूपाली आल्हाट यांना कोणतेही पद नसताना अनेक लोकहिताची कामे निस्वार्थपणे जनतेची सेवा करता आमचे दैवत हिंदुह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे ८०% समाजकारण व २०% राजकारण हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर लागू होते.
गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत २०१७ ला अवघ्या ४७ मतांनी त्यांचा पराभव झाला. परंतु येत्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना पक्ष संपुर्ण ताकदीने रूपालीताई आल्हाट यांच्या पाठीशी खंबिरपणे उभा आहे, त्यामुळे त्यांनी काळजी करू नये.
सचिन अहिर म्हणाले, माझी पुणे जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर मी प्रत्येक गावागावात, वाड्यावस्त्या फिरलो. परंतु एखाद्या शिवसैनिकांनी कसे काम करावे, हे आल्हाट दांम्पत्याकडे बघितल्यानंतर लक्षात येते. माझी संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाली त्यानंतर माझ्या सतत संपर्कात राहुन जनतेसाठी काय काय नविन करता येईल, याबद्दलच सतत विचारतात.
भविष्यात आघाडीवर होईल का नाही हे नाही माहिती, परंतु संपुर्ण शिवसेना पक्ष पुर्ण ताकदीने आपल्या पाठीशी खंबिरपणे उभा राहिल. आल्हाट दांम्पत्याला त्यांच्या कामामची पावती मिळेल याची मी ग्वाही देतो असे अहिर शेवटी बोलताना म्हणाले.
























Join Our Whatsapp Group