पिंपरी (Pclive7.com):- मोहननगर येथील ई.एस.आय.एस. हॉस्पिटलमध्ये शिवसेना नगरसेविका मिनल यादव यांच्या उपस्थितीत १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती देताना नगरसेविका मिनल यादव म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दिनांक ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी करण्यात आलेले आहे. सदर वयोगटासाठी कोव्हॅक्सिन या लसीचा वापर करण्यात येणार आहे.
मोहननगर येथील ई.एस.आय.एस. हॉस्पिटलमध्ये महापालिकेच्या वतीने ५० टक्के ऑफलाइन नोंदणी करण्याची सोय करण्यात आलेली आहे. तरी परिसरातील १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींनी लसीकरण करून घ्यावे.
























Join Our Whatsapp Group