राजीव गांधी यांना युवक काँग्रेसचे अभिवादन
पिंपरी (Pclive7.com):- भारत देश संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महासत्ता म्हणून जगभर ओळखला जात आहे. भारतात संगणक क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी पुढाकार घेतला त्यामुळे राजीव गांधी हे भारतीय संगणक क्षेत्राचे जनक आहेत असे युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी सांगितले.
स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त शहर युवक काँग्रेसच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला काळेवाडी, पिंपरी येथे युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष कौस्थुभ नवले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आहे.

यावेळी जाधव बोलत होते. यावेळी पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रतिक जाधव, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, युवक काँग्रेसचे शहर सरचिटणीस वसीम शेख, सचिव गौरव चौधरी, ऋषिकेश जाधव आणि काळेवाडी परिसरातील बाळ गोपाळ, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी जाधव यांनी सांगितले की, अठराव्या वर्षी युवकांना मतदानाचा अधिकार राजीव गांधी यांनी मिळवून दिला. आज राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या आठ टक्के हिस्सा संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा आहे. या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ भारत देशाएवढे कोणत्याच देशाचे नाही. त्यामुळे संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील बहुतांशी सर्वच कंपन्यांमध्ये भारतीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. हे स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या धोरणामुळे शक्य झाले असेही जाधव म्हणाले.
यानंतर या विद्यार्थ्यांना पिंपरी चिंचवड विज्ञान पार्कची (सायन्स पार्क) मोफत सफर घडवून आणली. यावेळी येथील शास्त्रीय खेळणी व उपकरणांची माहिती मुलांना देण्यात आली.
























Join Our Whatsapp Group