पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना प्रभाग प्रमुख युवराज दाखले यांच्या ‘अखंड जनसेवा’ या अॅपचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. शिवसेना सचिव खासदार आनिल देसाई यांच्या हस्ते शिवसेना भवन दादर मुंबई या ठिकाणी या अॅपचे उद्घाटन झाले.
पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच अशा पध्दतीचे अॅप तयार करण्यात आले आहे. या ‘अखंड जनसेवा’ अॅपमुळे शहरातल्या जनतेच्या विविध समास्याचे निराकरण होण्यासाठी मदत होणार आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर अनिल देसाई यांनी युवराज दाखले यांचे व अॅप डेव्हलपर्स रविकिरण घटकार यांचे कौतुक केले.
यावेळी शिवसेना भंडारा-गोदींयाचे जिल्हा संपर्कप्रमुख निलेश धुमाळ, शिवसेना प्रभाग प्रमुख युवराज दाखले, गणेश आहेर, निलेश भोरे, तसेच चाणक्य आय.टी. सोल्युशनचे रविकिरण घटकार तसेच शिवसैनिक उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group