पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे निलख परिसरातील अनधिकृत पोस्टरविरुद्ध केलेले आंदोलन मागे घेण्यासाठी कार्यालयात येवून जीवे मारण्याची धमकी देत असल्याची तक्रार भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी सांगवी पोलिस ठाण्यात दिली आहे. नगरसेवक तुषार कामठे यांनी एकुमसिंग कोहली (रा. दापोडी) यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.
तुषार कामठे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एकुमसिंग हा मला सातत्याने फोन करत आहे. तसेच अनधिकृत पोस्टरविरुध्द केलेले आंदोलन मागे घेण्यासाठी प्रत्यक्ष आमच्या कार्यालयात येवून मला दमदाटी केली. त्याने अनेक वेळा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, आम्ही त्याला सौजन्याने फोनवर बोलूनसुद्धा त्याचा उर्मटपणा थांबला नाही. तो सातत्याने अनधिकृत पोस्टरविरुद्ध आम्ही उचललेले धोरण थांबविण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देत आहे. एकुमसिंग हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. तरी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच मला पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी देखील कामठे यांनी तक्रारीत केली आहे.
























Join Our Whatsapp Group