पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणूकीस एक वर्ष पूर्ण झाले गेल्या एक वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड शहरवाशियांनी सत्ता परिवर्तन केले, राष्ट्रवादीच्या मनमानी कारभाराला कंटाळून पूर्व श्रमीचे राष्ट्रवादीचे नेते, नगरसेवक भाजपमध्ये दाखल होऊन त्यांनी आपल्याच नेत्याला आव्हान देऊन सत्ता काबीज केली. भय भ्रष्टाचार मुक्त पिंपरी चिंचवड करणार असल्याच्या घोषणा केल्या, ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’चा नारा दिला. पण गेल्या एक वर्षाच्या काळात सत्ता मिळालेल्या भाजपा कडून पिंपरी चिंचवडकरांची घोर निराशा झाल्याचे मत खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले आहे.
खासदार बारणे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत आश्वासनाची खैरात केली राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारावर पोवाडे गायले गेले, मूर्ती खरेदी भ्रष्टाचारापासून अनेक भ्रष्टाचाराचे दाखले दिले. परंतू गेल्या वर्षभरात एकही भ्रष्टाचाराचा आरोप भाजपाला सिद्ध करू शकली नाही. महापालिका निवडणूकीत आश्वासनाची खैरात घालण्यात आली. अनाधिकृत बांधकामे नियमित करणार, शास्ती कर रद्द करणार, रखडलेले पुर्नवसन प्रकल्प सूरू करणार, बंद पवना जलवाहीनी बाबत निर्णय घेणार, पाणी – कचरा ह्या मुलभूत समस्या सोडवण्याबरोबरच भय, भ्रष्टाचार मुक्त पिंपरी चिंचवड शहर करणार, परंतू या सर्व आश्वासनाचा विसर सत्ताधार्यांना पडला असल्याचे खासदार बारणे यांनी म्हटले आहे.
दुसऱ्यावंर आरोप करून टीका करणे सोपे असते परंतू अनेक राष्ट्रवादी – काँग्रेस मध्ये भ्रष्टाचाराची फळे चाखणारे सत्ता मिळताच त्यांच्या मूळ भुमीकेत आले आहे. गेल्या एक वर्षापूर्वी शहरवासियांना दिलेल्या आश्वासनाचा पूर्ण विसर पडला आहे. अनाधिकृत बांधकामाबाबात राज्य शासनाने निर्णय घेऊनही त्याचा शहरवाशियांना कोणताही फायदा झाला नाही. शास्तीकर माफी बाबत सर्व मौन पाळुन आहे. विकासाच्या नावावर रिंगरोड बाधित नागरिकांना बेघर करण्याचा डाव आखला गेला. परंतु त्या भागातील नागरीकांनी त्याला प्रचंड विरोध करीत आजपर्यंत तो टाळून लावला आहे. बीआरटी मार्गावर कोट्यावधी रूपये खर्च करूनही बीआरटी चालु होऊ शकली नाही. विठ्ठलनगर, ओटास्कीम लिंकरोड या झोपडपट्टी धारकांच्या पुर्नवसन प्रकल्पाला ज्यांनी विरोध केला त्या प्रकल्पाचे एक वर्षात काय झाले हे ही ह्यांना सांगणे कठीण झाले असल्याचे बारणे म्हणाले.
पिंपरी चिंचवड शहरात दिवसोंदिवस कचरा, पाणी ह्या समस्य़ा वाढत आहेत. नागरीकांच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांना फुरसत नाही. नागरीकांना चौपट पाणीदर वाढीचा भुर्दंड मात्र सोसावा लागणार आहे. भयभ्रष्टाचार मुक्तीच्या घोषणेचा पूर्ण विसर सत्ताधारी भाजपाला पडला आहे. शहरात रोज अनेक टोळकी सर्वसामान्य नागरीकांची वाहने तोडफोड करीत आहे. संपूर्ण शहरात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असुन अनेक गुन्हेगार राजरोस पणे हप्ते वसुली करीत आहेत. गुन्हेगारंना एक प्रकारे राजआश्रयच मिळाला आसल्याचे नागरीक खाजगीत बोलु लागले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे भ्रष्टाचाराचे कुरणच बनले आहे. अनेक निविदा संगनमत करून भरल्या जाऊ लागल्या आहेत. प्रशासन व सत्ता पक्ष दोन्ही ही भ्रष्टाचाराला पाठीशी घालू लागल्याने सर्व काही अलबेल असल्याचा दिखावा करू लागले असल्याने पिंपरी चिंचवडकरांनी सत्ता परिवर्तन करूनही आपली घोर निराशा झाल्याने यांच्या पेक्षा पहिले बरे असे बोलू लागले असल्याने भाजपाच्या एक वर्षाची पूर्ती म्हणजे हाती सत्ता देऊन शहरवासियांच्या पदरी घोर निराशा आली असल्याचे खासदार बारणे यांनी म्हंटले आहे.
























Join Our Whatsapp Group