पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडीवरून बरेच महाभारत घडले आहे. आमदार महेश लांडगे गटाला अध्यक्षपदावरून डावलल्याने मोठा राजकीय भूकंप झाला आहे. नितीन काळजे यांनी महापौर पदाचा राजीनामा दिला. तर लांडगे समर्थक राहुल जाधव यांच्यासह जुने निष्ठावंत शितल शिंदे यांनी स्थायीच्या सदस्यपदाचा राजीनामा पक्षनेते तसेच शहराध्यक्षांकडे देऊन आपली नाराजी जाहिर केली आहे.
स्थायी अध्यक्षपदी भोसरीचे आमदार लांडगे समर्थक राहुल जाधव तसेच जुने निष्ठावंत शितल शिंदे यांना डावलून आमदार जगताप समर्थक ममता गायकवाड यांचा अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळेच सर्व नाराजांनी राजीनामे दिले आहेत.
राजीनाम्याबाबत बोलताना महापौर काळजे म्हणाले की, शहराच्या स्थायी समिती सभापती पदी राहुल जाधव यांना संधी देण्यात माझ्या पदाची भौगोलिक अडचण झाली असेल म्हणून आमदार महेश दादा लांडगे यांच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या वृत्तीचा आदर करुन मनापासून महापौर या पदाचा राजीनामा दिला आहे.
तर भाजप आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, सर्वच प्रमुख पदाधिकार्यांचे राजीनामे पक्षानामे घेतले असून अजून कोणताही स्विकारलेला नाही. लवकरच पक्षाची भूमिका स्पष्ट करू.






















Join Our Whatsapp Group