नगरसेवक विनोद नढे यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी दि.५ एप्रिल रोजी काळेवाडीत भव्य “महाआरोग्य शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांना मोफत व सवलतीच्या दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश असून या शिबिराचे आयोजन नगरसेवक विनोद नढे यांनी केले आहे.

हे शिबिर रविवारी दि.०५ एप्रिल रोजी सकाळी १० ते २ या वेळेत नगरसेवक विनोद नढे यांच्या जनसंपर्क कार्यालय, पवना चौक, तळेगाव काळेवाडी येथे पार पडणार आहे. या उपक्रमात SMD मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व YCM (यशवंतराव चव्हाण मेमोरियल) हॉस्पिटल यांचा सहभाग असणार आहे. या शिबिरात डॉक्टर सल्ला, रक्तदाब (BP), BMI, ECG, ब्लड शुगर (Fasting & PP), HbA1c अशा विविध तपासण्या केल्या जाणार आहेत. तसेच रक्त तपासण्यांवर ५० टक्के, औषधांवर २० टक्के व CT Scan, MRI, USG यांवरही २० टक्के सवलत देण्यात येणार आहे. याशिवाय लिपिड प्रोफाइल व व्हिटॅमिन D3 या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.

YCM हॉस्पिटलतर्फे नेत्र, कान-नाक-घसा, हृदय, किडनी, कॅन्सर, डायालिसिस तसेच विविध गंभीर आजारांवरील मार्गदर्शन व तपासणी केली जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून प्रत्येक रक्तदात्यास स्मार्ट वॉच भेट देण्यात येणार आहे. तसेच थेरगाव हॉस्पिटलमधील रुग्णांना मोफत फळांचे वाटप केले जाणार आहे. नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक नगरसेवक विनोद नढे यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group