पिंपरी (Pclive7.com):- बास्केटबॉल खेळताना लोखंडी अंगावर खांब कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.५) सकाळी सात वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तळेगाव-चाकण रस्त्यावरील तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटच्या आवारात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल वर्मा (वय २०, तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूट विद्यार्थी वसतिगृह, इंदोरी, ता. मावळ, पुणे. मूळ रा. आयोध्या, उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तोलानी इन्स्टिट्यूटच्या आवारात विद्यार्थी बास्केटबॉल खेळत होते.

दरम्यान, विशाल हा बास्केटबॉल रिंगला लटकला असता रिंग तुटली आणि त्यापाठोपाठ लोखंडी खांबदेखील खाली पडला. लोखंडी खांब अंगावर पडल्याने विशाल गंभीर जखमी झाला. तत्काळ उपचारासाठी त्याला तळेगाव दाभाडे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.



















Join Our Whatsapp Group