पिंपरी (Pclive7.com):- संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ४ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नवीन फुलेनगर परिसरातील मोकळ्या मैदानात करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे आर्थिक फायद्यासाठी एकत्र येऊन पैशांवर जुगार खेळत होते. याची गुप्त माहिती मिळताच संत तुकारामनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकून त्यांना रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रतिक बाळकृष्ण बगाटे (वय २८ रा. विठ्ठल नगर पिंपरी), अमित दिलीप गायकवाड (वय २७, या. शनी मंदिर चौक संत तुकाराम नगर), किरण मारुती कांबळे (वय ३८, रा. विठ्ठल नगर पिंपरी), पंकज भगवान ओव्हाळ (वय ३४, या. विठ्ठल नगर पिंपरी), दत्ता रवी हजारे (वय २२, विठ्ठल नगर पत्राशेड पिंपरी), रोहित प्रभाकर शिंदे (वय २५, या. विठ्ठल नगर पिंपरी) आणि सूरज विजय घोडके (वय ३४, रा. विठ्ठल नगर पत्रा शेड पिंपरी) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी आरोपींकडून जुगाराचे साहित्य जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार व्यवसायावर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.




















Join Our Whatsapp Group