पिंपरी (Pclive7.com):- माजी केंद्रिय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशालभाऊ वाकडकर सोशल फाऊंडेशन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नितीन काकडे यांच्या वतीने आज रविवार दि.९ रोजी वाकड येथील संत तुकाराम मंगल कार्यालय येथे राज्यस्तरीय खुली कराटे स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, शंकरभाऊ मांडेकर, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, राजेंद्र साळुंखे, शंकरराव वाकडकर,तानाजी हुलावळे, दिलीप हुलावळे, विशाल काळभोर, मयुर जाधव, हर्षवर्धन भोईर, कुणाल थोपटे, निलेश निकाळजे, विशाल पवार, विनायक काळभोर, भागवत जवळकर, अमोल पाटील, काशिनाथ तेलंगे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेला पिंपरी चिंचवड शहरासह राज्यभरातून स्पर्धक आले होते. यावेळी ७०० ते ८०० मुला-मुलींनी कराटे स्पर्धेत सहभाग नोंदविला. प्रथम चषक ड्रँगन मार्शल आर्ट (पुणे), द्वितीय चषक आँल कराटे चँम्पियन अकँडमी (नाशिक), तृतीय चषक डिफेन्स स्पोर्टस अकँडमी (पिंपरी चिंचवड) यांनी पटकाविले.यावेळी त्यांना ट्राँफी व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. सहभागी सर्व खेळाडूं सोबतच मलेशिया येथे आयोजित कराटे स्पर्धेत सहभागी व विजयी होणा-या पिंपरी चिंचवडच्या स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी कराटे क्षेत्रातील मान्यवर व शहरातील नागरीक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.





















Join Our Whatsapp Group