मुंबई (Pclive7.com):- मराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाबाहेर हा हल्ला करण्यात आला आहे. उच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी सुरु होती. यानंतर न्यायालयात काय घडलं यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना एका व्यक्तीने एक मराठा लाख मराठा अशी घोषणा करत गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला केला. यावेळी तिथे उपस्थित इतर वकिलांनी त्या व्यक्तीला थांबवत त्याला चांगलाच चोप दिला.
मारहाण करणाऱ्या व्यक्तीने आपलं नाव वैद्यनाथ पाटील असून जालना जिल्ह्याचे रहिवासी असल्याचं प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे. वैद्यनाथ पाटील नेमका कोण आहे याबद्दल माहिती अद्याप मिळालेली नाही.





















Join Our Whatsapp Group