मुंबई (Pclive7.com):- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी हरेश आबा नखाते व सुजाता हरेश नखाते यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे तसेच माजी खासदार आनंद परांजपे आदी उपस्थित होते.

पक्षप्रवेशाच्या वेळी विभागप्रमुख गोरख पाटील, अमोल राठोड, एकनाथ मंजाळ, संभाजी नढे, काटे मामा, बाळासाहेब येडे, महादेव बिक्कड, कृष्णा येळवे, राम खमीतकर, सुधीर दुधमल, प्रजाक नढे, सुभाष काजारी, रोहित नखाते, लक्ष्मण टोणपे, मनीषा येडे, मनोज जगताप, अर्जुन गोरगेल आणि हर्षल धाकतोडे यांनीही शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

हरेश नखाते व सुजाता नखाते यांच्या या पक्षप्रवेशामुळे परिसरातील शिवसेना संघटनेला बळ मिळणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.




















Join Our Whatsapp Group