पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा, जनहिताच्या कार्याचा आणि सर्वसामान्यांसाठी केलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या विचारांचा वारसा समाजसेवेच्या माध्यमातून पुढे नेण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला.

“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशातून आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात युवकांसह विविध वयोगटातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेत रक्तदान केले. या उपक्रमातून गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल, नगरसेवक सागर कोकणे, नगरसेवक जितेंद्र ननावरे, माजी नगरसेवक बबनराव गाढवे, कैलासभाऊ थोपटे, सतीशदादा दरेकर, युवक शहराध्यक्ष शेखर काटे, युवा नेते उमेश काटे, चंद्रकांत तापकीर, सुमित डोळस, काळूराम कवितके, दिपक जाधव, शिवशंभो मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, आजी-माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. समाजहिताच्या विविध उपक्रमांद्वारे जनसेवेचा वारसा जपत नागरिकांसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.





















Join Our Whatsapp Group