या पोस्टरमध्ये अनुपम खेर यांची मनमोहन सिंग यांच्या रुपातील झलक पाहायला मिळत आहे. ‘मैं मनमोहन सिंग ईश्वर की शपथ लेता हूँ…’, असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय खन्नाचीही महत्त्वाची भूमिका आहे.
हा चित्रपट संजय बारू यांच्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकावर आधारित आहे. चित्रपट ११ जानेवारी ला प्रदर्शित होणार आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित करण्याआधी आम्हाला दाखविण्यात यावा अन्यथा चित्रपट देशात रिलीज होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसच्या नेत्यांनी दिला आहे.






















Join Our Whatsapp Group