पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमध्ये आज स्वर्गीय प्रधान आबाजी कुंजीर प्रतिष्ठानच्या वतीने कैलास कुंजीर स्पोर्टस् अकादमीचे उद्घाटन झी चोवीस तासचे प्रतिनिधी कैलास पुरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अकादमीचे प्रमुख कैलास कुंजीर यांच्यासह युवराज काटे पाटील, मनोज ब्राह्मणकर, राजुशेठ शेलार, नाना पारखी यांच्यासह कुंदन इस्टेट वसाहतीचे रिशी पाटील, बालाजी बंडेवार, मनोज शिर्के, निखिल धोड उपस्थित होते.
पिंपळे सौदागरच्या ट्रायोज सोसायटीतील क्रिकेट प्रेमींसाठी कैलास कुंजीर यांनी मैदान उपलब्ध करून दिले आहे. त्याच ठिकाणी ही अकादमी सुरू होणार आहे. खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे अकादमीचे प्रमुख कैलास कुंजीर यांनी सांगितले. तर कैलास पुरी यांनी खेळाडूंसाठी मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल कुंजीर यांचे कौतुक केले. यावेळी ट्रायोज सोसायटीतील संजय बंडगर, किरण इंदलकर, साईनाथ चित्ते, शामकांत देवरे, युवराज चौधरी, अनिल भामरे, परीक्षित पाध्ये, बालाजी राजमाने, मयूर सदावर्ती, विजय समधानी, भूषण महाजन, निशांत कार्ला, रोहित सानेर, किशोर परगुट, विपुल बराठे, चिराग अगरवाल हे क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.