पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आणि ताथवडे-पुनावळे-काळाखडक आणि वाकड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. ‘हमारा साथी’च्या माध्यमातून पवार यांनी आदर्शवत कार्य उभा केले आहे, असे कौतुक या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी केले.
ताथवडे-पुनावळे- काळाखडक आणि वाकड परिसरातील नागरिकांच्या नागरी समस्या तात्काळ सोडवता याव्यात. यासाठी संदीप पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गतवर्षी ‘हमारा साथी’ हेल्पलाईन सुरू केली. त्याला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या हेल्पलाईन सुविधेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमात आलेल्या मान्यवरांनी ‘हमारा साथी’च्या कार्याला दाद दिली. शनिवारी (दि.५ जानेवारी) आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते हनुमंत गावडे, ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, पंकज भालेकर, संतोष कोकणे, विनोद नढे, शिवसेना नगरसेवक निलेश बारणे, भाजप नगरसेवक तुषार हिंगे, स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, गणेश भोंडवे, अतूल शितोळे, राजेंद्र साळुंखे, राजेंद्र जगताप, भारत केसरी विजय गावडे, राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा सुप्रिया पवार, शहर उपाध्यक्ष राजेंद्र थोरात, सामाजिक न्याय संघटनेचे अध्यक्ष विनोद कांबळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी यांच्या सह शैक्षणिक, राजकीय, औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी हजेरी लावली.
जाहिरात फ्लेक्सवर पार्थ पवार यांचे ‘ब्रॅंडिंग’..
माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा निष्ठवान कार्यकर्ता अशी ओळख संदीप पवार यांची आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे. याचा धागा पकडून संदीप पवार यांनी चिंचवड आणि शहर परिसरात वाढदिवसानिमित्त केलेल्या फ्लेक्सवरील जाहिरातीमध्ये पार्थ पवार यांचाही उल्लेख आवर्जुन केलेला आहे. त्याद्वारे पार्थ यांच्या उमेदवारीचे पिंपरी चिंचवडमधून पहिले ‘बँडिंग’ पवार यांनी सुरू केले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरु लागली आहे. तसेच, नवीन वर्षानिमित्त पवार यांनी प्रसिद्ध केलेल्या दिनदर्शिकेवरही पार्थ पवार यांच्या फोटो छापण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार यांनी आपल्या निष्ठवान कार्यकर्त्यांना आता कामाला लागा, असे संकेत दिले आहेत काय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.