आळंदी (Pclive7.com):- रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर यांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात राखी अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्मिक वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र भैया पाटील, ह.भ.प. रवींद्र महाराज हारणे, संदीप पाटील यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांना राखी अर्पण केली. तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्त ॲड. रोहिणीताई पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

रक्षाबंधन हा प्रेम, विश्वास आणि नातेसंबंध दृढ करणारा सण असून, संतांच्या चरणी राखी अर्पण करून समाजात बंधुभाव, ऐक्य आणि अध्यात्मिक मूल्ये वृद्धिंगत व्हावीत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.




















Join Our Whatsapp Group