पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश युवा मोर्चाच्या महामंत्रीपदी पिंपरी चिंचवड शहरातील युवा नेतृत्व तेजस्विनी राजाभाऊ दुर्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी ही शहरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. पक्ष संघटन, युवकांचे प्रश्न आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात सातत्याने सक्रिय असलेल्या तेजस्विनी दुर्गे यांच्या कार्याची दखल घेत प्रदेश नेतृत्वाने त्यांना ही महत्त्वाची संधी दिली आहे.

ही नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक आणि विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या विशेष प्रयत्नातून झाली आहे. तसेच भाजप पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे यांचे मोलाचे सहकार्य या नियुक्तीसाठी लाभले आहे.

यावेळी बोलताना तेजस्विनी राजाभाऊ दुर्गे म्हणाल्या, “आज मला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश महामंत्री या पदावर काम करण्याची संधी मिळाली, ती केवळ आणि केवळ प्रदेश नेतृत्व आणि स्थानिक नेतृत्वाच्या विश्वासामुळे. त्याच बरोबर माझे वडील माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे आणि आमच्या सर्वांचे आधारस्तंभ आमदार अमित गोरखे यांचे मार्गदर्शन आणि साथ नेहमीच माझ्या पाठीशी राहिली आहे. या सर्व मान्यवरांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते. पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवेन आणि मला दिलेल्या या संधीचे मी नक्कीच सोने करून दाखवेल, अशी ग्वाही देते.” तेजस्विनी दुर्गे यांच्या नियुक्तीबद्दल शहरभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

















Join Our Whatsapp Group