पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील व लगतच्या भागातील वाहतुक सुरळीत होणेच्या दृष्टीकोनातुन व नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अश्या पध्दतीने नियोजन करण्यासाठी महापौर राहुल जाधव यांनी आज वाहतुक पोलीसांसोबत बैठक घेऊन संबधितांना सुचना दिल्या.
महापौर कक्षात झालेल्या या बैठकीत वाहतुक सहा.पोलिस आयुक्त निलीमा जाधव, वाहतुक पोलिस निरीक्षक निबांळकर, जाधव, म्हसवडे यांना सुचना दिल्या. तसेच पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील सर्व अंतर्गत व मुख्य रस्त्यावरील बेवारस वाहने तातडीने हटवुन नागरिकांसाठी रस्ता खुला करण्याची विनंती केली. शहरामध्ये पार्किंग बाबत योग्य ते धोरण राबवुन वाहनांना शिस्त लावण्याबाबत सुचना दिल्या.
वाहतुक पोलिस निरीक्षकांनी त्यांना येत असलेल्या अडचणींची महापौरांना माहिती दिली. तसेच अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांसाठी वाहतुक बॅरीकेट्स व जॅमरची मागणी केली. त्यानंतर महापौर राहुल जाधव यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील विद्युत, स्थापत्य व बीआरटीएस विभागातील अधिकाऱ्यांना वाहतुक शाखेला आवश्यक ती मदत करण्याबाबत सुचना दिल्या. याबैठकीला नगरसेवक मयुर कलाटे व तुषार कामठे, भाजपा युवा मोर्चाचे अनुप मोरे तसेच परिवहन कक्ष प्रमुख श्रीकांत सवणे, ज्ञानदेव जुधांरे, कार्यकारी अभियंता बीआरटीएस, कार्यकारी अभियंता विद्युत गिलबिले, उप अभियंता परिवहन कक्ष विजय सोनवणे व कनिष्ठ अभियंता परिवहन कक्ष अनिल भोईर उपस्थितीत होते.






















Join Our Whatsapp Group