पिंपरी (Pclive7.com):- खान्देश संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने व नागरिकांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी एकत्र येण्यासाठी सांगवी परिसर खान्देश मित्र मंडळाच्या वतीने मंडळाच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
जुनी सांगवी येथील डॉल्फिन शाळेच्या सभागृहात आयोजित केलेल्या या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अश्विनी लक्ष्मण जगताप तसेच माजी नगरसेवक व उद्योजक शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक नामदेव ढाके, हर्षल ढोरे, संतोष कांबळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अशोक सोनवणे, राज सोमवंशी,वराजेंद्र पाटील, नगरसेविका माई ढोरे, शारदा सोनवणे, उषा मुंढे, तेजश्री ढोरे, मंडळाचे अध्यक्ष उमेश बोरसे आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. खान्देशातून उद्योग, व्यवसाय निमित्त पिंपरी, चिंचवड व पुणे शहरात स्थायिक झालेल्या खान्देशी बांधवाच्यावतीने दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन केले जाते. याप्रसंगी मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेविका माई ढोरे यांनी खान्देश परिसरातील नागरिकांनी परिसराच्या विकासात व विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे व त्यांच्या सहभागाचे कौतुक केले व स्नेहमेळाव्या प्रमाणेच वधु-वर मेळावा व खान्देशी पद्धतीचा लग्नसोहळा पुणेकरांना व सांगवीकरांना अनुभवता यावा व सहभागी होण्यासाठी करावा असे आपल्या मनोगतातून सांगितले. तर अश्विनी जगताप यांनी खान्देशी पुरणाचे मांडे व वरण बट्टी याविषयी आवड असल्याचे व त्यांची गोडी प्रमाणेच खान्देशी लोकांनी स्थानिक पातळीवर गोडी निर्माण केल्याचे सांगितले.
यावेळी मंडळाच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. सुनील भावसार यांच्या जुन्या व नवीन हिंदी मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. अध्यक्ष उमेश बोरसे यांनी प्रास्ताविक केले. मनोहर पवार व पंकज पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तर विजय पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी दिलीप पाटील, जगदीश सोनवणे, अमोल बडगुजर, मनोहर पवार, राजू वानखेडे, दिनेश चौधरी, मनोज ठाकूर, अरुण अहिरराव, अरुण साळुंके, लोटन बोरसे, नितीन पाटील व इतर मंडळाचे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.






















Join Our Whatsapp Group