पुणे (Pclive7.com):- जुन्नर तालुक्यातील येडगाव खानेवाडी येथे मंगळवारी रात्रीच्या सुमाराम धनगरांच्या वाड्यावर (मेंढरासोबत वास्तव्याचे ठिकाण) बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये बिबट्याने शिकारीच्या हेतुने ४ महिन्यांच्या मुलीची शिकार केली आहे. कल्याणी सुखदेव झिटे, असे त्या चिमुकल्या मुलीचे नाव आहे.
सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे धनगर समाज रोज एका गावातून दुसऱ्या गावात आपला संसार मेंढ्याबरोबर मांडत आहेत. सध्या जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मेंढपाळांचा उघड्यावरचा हा संसार धोक्यात आला असून मंगळवारी बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकल्या मुलीचा जीव गेला. या घटनेनंतर जुन्नर तालुक्यात सध्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येडगाव खानेवाडी येथील एका शेतात धनगरांचा वाडा वास्तव्यासाठी होता. मंगळवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने या वाड्यावर हल्ला करत चिमुकल्या मुलीला शिकारीच्या हेतुने उचलुन नेले. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने या मुलीचा शोध घेतला असता, तिचा मृतदेह वाड्याजवळीच असलेल्या रामदास भिकाजी भोर यांच्या फ्लॉवरच्या शेतीमध्ये आढळून आला. दरम्यान, दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले वाढत असताना मानवी जीवांसह पाळीव प्राण्यांना बिबट्यापासून मोठा धोका निर्माण झाला आहे. बिबट्याच्या या दहशतीवर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून जोर धरत आहे.






















Join Our Whatsapp Group