पिंपरी (Pclive7.com):- पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त गणपतराव सदाशिव माडगूळकर यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. त्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. उद्या शुक्रवारी दि.१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता हिंजवडी येथील हॉटेल मधुबन येथे त्यांचा नागरी सत्कार होणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, आमदार लक्ष्मण जगताप, संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या हस्ते हा सत्कार होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महापौर राहुल जाधव उपस्थित राहणार आहेत. यावेळी बिल्डर असोसिएशन, नवी मुंबई आणि रायगड जिल्हा, अध्यक्ष संग्राम पाटील, पंढरपुरचे माजी नगराध्यक्ष अरुण कंडरे यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाचे संयोजन पुणेरी येलमार परिवार, भरत अल्हाट, संपत विनोदे मित्र परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.