पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्य इंटर इंजिनिअरींग डिप्लोमा स्टुडंटस् स्पोर्टस अशोसिएशनने (आयईडीएसएसए) जानेवारी महिन्यात आयोजित केलेल्या विविध क्रिडा स्पर्धांतील ‘डी -१ झोन’ मध्ये घवघवीत यश मिळविले.
फुटबॉल, बास्केट बॉल, टेबल टेनिस या स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक महाविद्यालयाने (पीसीपी) विजेतेपद पटकाविले. यशस्वी विद्यार्थी व प्राचार्या व्ही.एस.ब्यॅकोड, प्रा. एस.आर.पाटील, प्रा. व्ही.व्ही.भालेकर, एस.व्ही. कुचेकर, एस.एम. औसेकर, एच.एम. नागले, ए.ए.मराठे, एम.एस. पवार, एम.यु. सानप, डी.ए.सांडभोर यांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी अभिनंदन केले.






















Join Our Whatsapp Group