पिंपरी (Pclive7.com):- चिखली येथे साकारत असलेल्या संतपीठाच्या कामाच्या निविदेत सत्ताधारी भाजपाने रिंग केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने आज लक्षवेधी आंदोलन केले. महापालिकेच्या मुख्यालयात होत असलेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजप विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप लिखीत पेहरावे परिदान करून निषेध व्यक्त केला.
़
विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. यावेळी राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी सत्ताधारी भाजपच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. महापालिकेत होत असलेल्या सर्वसाधारण सभेत या सर्व आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांनी येऊन निदर्शने केली.






















Join Our Whatsapp Group