पिंपरी (Pclive7.com):- गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष…, टाळ-मृदंगाचा गजर…, महापूजा, आरती, महाप्रसाद, पालखी सोहळा अशा भक्तिमय वातावरणात माघी गणेश जयंती उत्सव पिंपरी चिंचवड शहरात संपन्न झाली. पिंपरीगाव येथील मित्र सहकार्य तरूण मंडळाच्यावतीने गणेश मंदीराचा जिर्णाेध्दार करून मोठ्या उत्साहात गणेश जयंती साजरी करण्यात आली.

शहरातील विविध गणेश मंदिरांमध्ये अभिषेक, महापूजा, महाआरती, महाप्रसादाचे वाटप अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल दिवसभर चालू होती. पहाटेच्या आरतीपासून ते सायंकाळी निघणाऱ्या बाप्पाच्या पालखी सोहळ्यात भाविकांची अलोट गर्दी बघायला मिळत होती. पिंपरीगाव येथील मित्र सहकार्य तरूण मंडळाच्यावतीने गणेश मंदीराचा जिर्णाेध्दार करून मोठ्या उत्साहात गणेश जयंती साजरी करण्यात आली. मंडळाने मंदिराचे नुतनीकरण करून रंगरंगोटी केली. तसेच मंदिराला फुलांची सजावट करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंडळाचे हे ५५ वे वर्ष आहे. या गणेश मंदिराक सकाळी अभिषेक, गणेश याग, किर्तन सोहळा, महाप्रसाद आदी कार्यक्रमांसाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी आमदार गौतम चाबुकस्वार, माजी आमदार अण्णा बनसोडे, नगरसेवक संदीप वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, युवा नेते ऋषिकेश वाघेरे पाटील, तसेच प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, शैक्षणिक, पोलीस, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी यावेळी हजेरी लावली. यावेळी महाप्रसादाचा भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.





















Join Our Whatsapp Group