पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पिंपळे सौदागर ते पुणे मनपा तेजस्विनी बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिली.
पिंपळे सौंदागरचा ‘स्मार्ट सिटी’मध्ये समावेश करण्यात आला. परंतु पिंपळे सौदागर ह्या क्षेत्रामध्ये ७० टक्के लोकसंख्या ही आयटी क्षेत्रातील नोकरदार वर्ग असून यामध्ये महिला नोकरदार वर्गाचा ही मोठा समावेश आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा मार्फत फक्त महिलांसाठी तेजस्विनी ही बस सुरू करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केली होती. तसा प्रस्ताव पीएमपीएमएलच्या वाहतूक व्यवस्थापक विभागाकडे पाठवला होता.
शत्रुघ्न काटे यांच्या प्रयत्नांना आता खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर पिंपळे सौदागरमध्ये तेजस्विनी बस धावणार आहे. पिंपळे सौदागर ते पुणे मनपा या मार्गावर तेजस्विनी बससेवेचा शुभारंभ आमदार लक्ष्मण जगतात यांच्या हस्ते उद्या दिनांक १५ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती शत्रुघ्न काटे यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group