पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने प्रभाग क्र.२०, मधील कासारवाडी कर संकलन विभागीय कार्यालयाच्या तळमजल्यावरील नविन दवाखान्याचे उद्घाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले. राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांत सुरू असलेल्या श्रेयवादामुळे हा दवाखाना बहुचर्चित ठरला होता.
२०१३ साली बंद करण्यात आलेला कासारवाडीतील महापालिकेचा दवाखाना तब्बल ७ वर्षांनी नव्याने सुरू करण्यात आला आहे. हा दवाखाना येथील नागरिकांच्या सेवेकरिता अत्यंत उपयुक्त पडणार आहे. परंतू या दवाखान्याच्या उद्घाटनावरून चांगलेच नाट्य गेल्या काही दिवसांपासून कासारवाडीत रंगले होते. राष्ट्रवादीचे नगरसेवक शाम लांडे विरूध्द भाजपाचे स्विकृत सदस्य कुणाल लांडगे यांच्यात श्रेयवाद रंगला होता. कासारवाडी परिसरात या दोन्ही सदस्यांकडून याचे श्रेय घेण्यासाठी फलकबाजीतून चढाओढ लागलेली पहायला मिळली. त्यामुळे या दवाखान्याचे उद्घाटन कासारवाडीत बहुचर्चित ठरले होते. नागरिकांनी मात्र हा दवाखाना सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
सकाळी झालेल्या या उद्घाटनप्रसंगी ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, राष्ट्रवादीचे नगरसेवक शाम लांडे, नगरसदस्या सुजाता पालांडे, सुलक्षणा शिलवंत-धर, स्विकृत सदस्य माऊली थोरात, कुणाल लांडगे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, आरोग्य वैदयकीय अधिकारी के.अनिल रॉय, डॉ.वैभव सावळे, सहाय्यक आयुक्त आशा राऊत, कार्यकारी अभियंता केशवकुमार फुटाणे, प्रशासन अधिकारी वामन नेमाणे, सहाय्यक आरोग्य अधिकारी ज्ञानेश्वर सासवडकर, उपअभियंता विजय भोसले माहिती व जनसंर्क विभागाचे रमेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जवळकर आदी मान्यवर उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group