पिंपरी (Pclive7.com):- पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवायला सुरूवात केली आहे. अखेर भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर १००० किलोचे बॉम्ब फेकले ज्यामुळे दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्यात आले आहेत. मिराज विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून हवाई Surgical Strike करत ही मोठी कारवाई केली आहे. वायुसेनेनं केलेल्या या कामगिरीबद्दल पिंपळे सौदागरमधील उन्नती फाऊंडेशनच्यावतीने पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.

सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताकडून दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याचा एक भाग म्हणून भारताकडून हा हल्ला करण्यात आला आहे. येणाऱ्या काळात पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यात येणार आहे.
या निमित्ताने पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने उन्नती कार्यालय येथे दि. २६ फेब्रुवारी २०१९ रोजी संध्याकाळी ६ वाजता भारत मातेचे पूजन करून भारतीय वायुसेनेच्या कामगिरी बद्दल सर्वांना मिठाई वाटप करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दहशदवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. या वेळी पुलवामा येथे शहिद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
“पुलवामा येथे शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या दुःखात उन्नती सोशल फाऊंडेशन व सर्व सहकारी सहभागी आहोत. हा हल्ला म्हणजे दहशदवाद्यांचा भ्याड हल्ला असून अशा प्रकारचे हल्ले भारतीय लष्कर कदापी सहन करणार नाही, याचीच प्रचिती भारतीय वायुसेनेच्या कारवाईमुळे सिद्ध झाली आहे” असे मत उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी व्यक्त केले.
यावेळी निर्मलचंद उधोजी, राजू देवतारे, विकास काटे, गुलाब मेटे, राजू शेलार, बच्छराज शर्मा, रमेश वाणी, सुभाष पवार, विवेक भिसे, विवेक तितरमारे, राजेंद्र जसवाल, राजू देवतारे, कविता भिसे, जयश्री भोसले, सुनीता बच्चे, आनंद हास्य योगा क्लब चे सर्व सभासद, जेष्ठ नागरिक संघ, नवचैतन्य हास्य क्लबचे सदस्य व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group