पिंपरी (Pclive7.com):- पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे यांची नियुक्ती झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्त्या राज्य शासनाने हाती घेतल्या आहेत. त्यामध्ये शिवसेना-भाजप युतीनंतर शिवसेनेतील काही मातब्बरांना महामंडळावर संधी देण्यात आली आहे.
शिवसेना आणि भाजप युती झाल्यानंतर आता राज्यातील विविध महामंडळांचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची नियुक्ती झाली आहे. भाजपचे अमित गोरखे यांची आण्णाभाऊ साठे विकास महामंडळावर अध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील दोन सुशिक्षीत तरुणांना महामंडळांवर संधी मिळाली आहे.
नियुक्ती झाल्यानंतर कलाटे यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे नगरसेवक शत्रुघ्न काटे, राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू मिसाळ, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी यांनी कलाटे यांचा सत्कार केला.






















Join Our Whatsapp Group