पिंपरी (Pclive7.com):- लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. “मावळवर पुन्हा भगवा फडकवणारच” असा निर्धार शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आला आहे. विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी केलेल्या कामांच्या जोरावर पुन्हा आपणच निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केलायं. त्यासाठीच शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, आजी माजी पदाधिकारी तसेच शिवसैनिकांच्या निर्धार मेळाव्याचे आज रविवार दि.१७ रोजी थेरगाव येथे आयोजन केले आहे.
मावळ लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेचा “निर्धार मेळावा” आज रविवार दि.१७ रोजी सायं ६ वाजता थेरगाव येथील “सोनाई” मंगल कार्यालय, बीआरटी रोड, येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, अामदार गौतम चाबुकस्वार, संपर्क प्रमुख बाळा कदम, जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे उपस्थित राहणार आहेत. या वेळी शिवसेना उपनेते, प्रा. नितीन बानगुडे पाटील शिवसैनिकांना “विशेष मार्गदर्शन” करणार आहेत. तरी सर्व पदाधिकारी, शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर यांनी केले आहे.





















Join Our Whatsapp Group