पिंपरी (Pclive7.com):- खासदार श्रीरंग बारणेंचा पत्ता कट झालायं. लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांचा शिवसेनेत प्रवेश होणार. बारणे शिवसेना सोडायच्या तयारीत. या चर्चांची सध्या मावळ मतदारसंघात धुमाकूळ घातलायं. त्याला कारण आहे शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात होत असलेल्या दिरंगाई मुळे..!
राष्ट्रवादी कडून पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाली असताना शिवसेनेकडून मात श्रीरंग बारणे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही..! त्यातच लक्ष्मण जगताप भाजपसाठी मतदारसंघ सोडण्यास प्रयत्नशील आहेत..! पण अजूनही त्यांना त्यात यश आलेलं नाही..! त्यामुळे भावालाच शिवसेनेत पाठवत उमेदवार बनवण्याचा त्यांचा विचार सुरू आहे..! सध्या सोशल मिडीयावर या अफवांचा बाजार गरम झालायं..!
आता यात किती तथ्य हे सांगता येत नसले तरी यातली एकही अफवा जर खरी ठरली तर मावळची निवडणूक आणखी रंगतदार होणार यात शंका नाही..!






















Join Our Whatsapp Group